कोरोना टू कोरोना आज पुन्हा 15 पॉझिटिव्ह:बीडमध्ये धक्का

जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह आकडा वाढू लागला आहे 24 तासातच 24 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत दोन दिवसात 470 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये 451 अहवाल निगेटिव्ह आले तर 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यापूर्वीच 5 पॉझिटिव्ह आढळून आले होते,त्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या 277 झाली आहे यात बाहेर जिल्ह्यात 8 जण उपचार घेत आहेत तर बरे झालेले 143 रुग्ण आहेत,मयत 9 आहेत,आता ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 139 इतकी झाली आहे
आज पाठवण्यात आलेल्या सॅम्पल मध्ये पुन्हा आणखी 15 पॉझिटिव्हची भर पडली आहे कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले आहेत,बीड येथे 46 तर अंबाजोगाई येथे 50,औरंगाबाद येथे 6 आणि पुणे येथे 2 जण उपचार घेत आहेत,बीड जिल्ह्यात सध्या 82 ठिकाणी संचारबंदी लागू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!