पुणेमहाराष्ट्र

फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, भाजपसोबत येण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच होता



पुणे 23 जून: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं सत्ता स्थापनेचं नाट्य देशभर गाजलं होतं. त्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रात अजुनही सुरूच असतात. भाजपची (BJP) काडीमोड घेत शिवसेनेने(Shivsena) राष्ट्रवादी (Ncp)आणि काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्याआधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजित पवारांचा (Ajit Pawar)झालेला शपथविधी प्रचंड गाजला होता. त्याच घडामोडींबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचा नकार आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनच सत्तेसाठी सिग्नल मिळाले होते असा खुलासा त्यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी Insiderसाठी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक स्फोटक खुलासे केल आहेत.

फडणवीस म्हणाले, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता असा खुलासाही त्यांनी केला.
फडणवीसांनी नाव न घेता सरळ शरद पवारांच्या (Sharad Pawar) सांगण्यानंतरच अजित पवार भाजपला मिळाले असं थेटपणे सूचित केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर माझं आणि अजित पवारांचे सरकार 100 टक्के टिकले असते असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

.Devendra Fadnavis✔@Dev_Fadnavis

Priemere of my interview with Raju Parulekar @rajuparulekar https://www.pscp.tv/w/ccBVnTF3QkVBZE5rb1hKalB8MWVhSmJ6TWJWRFJKWAOAkQ148MJrHHQWoeV-8TBlaioknBojVl6GqINXU7W5 …Devendra Fadnavis @Dev_FadnavisPriemere of my interview with Raju Parulekar @rajuparulekarpscp.tv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *